COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : देशात मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल गांधींच्या लग्नाची जोरदार चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावरू वाऱ्यासारखी पसरली आहे. दोघांचे एकत्र असलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचं राहुल गाधींसोबत लग्नाचं वृत्त आमदार आदिती सिंह यांनी फेटाळून लावलं आहे. 


राहुल गांधी हे आपल्या भावासारखे


एवढंच नव्हे तर राहुल गांधी आपले मानलेले भाऊ असल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधींसोबत लग्नाचं वृत्त खोडसाळपणाचं आहे. या वृत्तानं आपण दुखावले गेल्याचंही त्यांनी ट्विटरवरून नमूद केलंय. राहुल गांधींसोबतचा फोटो हा सोनिया गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असतानाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.