नीरव मोदी राहुल गांधींना भेटायला आला होता; काँग्रेसच्या माजी नेत्याचा गौप्यस्फोट
एका पार्टीत हे दोघेजण भेटले होते.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्या भेटीवरून सध्या काँग्रेसने रान उठवले आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर काही वेळातच काँग्रेसचे माजी नेते शहजाद पुनावाला यांनी एक वक्तव्य करुन काँग्रेसला अडचणीत आणले आहे. २०१३ मध्ये राहुल गांधी एका पार्टीत नीरव मोदीला भेटले होते. याच काळात नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना बँकेकडून कर्ज देण्यात आले होते, असा दावा शहजाद पुनावाला यांनी केला.
राहुल गांधींनी ही गोष्ट खोटी आहे, हे सांगावे. सप्टेंबर २०१३ मध्ये नीरव मोदी आणि राहुल गांधी यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीच्या वेळी मी तिथे हजर होतो. याच काळात बँकांनी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले होते. मी लाय डिटेक्टर टेस्ट करायलाही तयार आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.