हाथरस अत्याचार : राहुल गांधी हाथरसकडे रवाना
कडक पोलीस बंदोबस्त, राहुल गांधी यांचा ताफा रोखणार?
लखनऊ : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे शिष्टमंडळ थोड्याच वेळात हाथरसला रवाना होणार आहे. हाथरसमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना संचारबंदीच्या काळात गावात प्रवेश मिळणार नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान यापार्श्वभूमीवर नोएडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आज पुन्हा राहुल गांधींचा ताफा पोलिसांकडून रोखण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उत्तर प्रदेश सरकारने रोखले होतं. यावेळी राहुल गांधी यांना जोरदार धक्काबुक्कीही करण्यात आली होती.
आज हाथरसला मीडियाला परवानगी देण्यात आली. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांना आक्रोश प्रथमच जगासमोर आला. आमच्यावर अन्याय झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे.