अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींचा हा फोटो होतोय व्हायरल
राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तब्बल १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहेत.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तब्बल १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहेत.
अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली
सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारताना राहुल गांधी जितके भाऊक तितकेच उत्साहपूर्ण भावमुद्रेत दिसत आहेत. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारत असताना सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, गुलाम नभी आझाद, यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
राहुल गांधी झाले भावूक
सोनिया गांधीकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर भावूक झालेल्या राहुल गांधींनी आपल्या आईच्या कपाळावर किस केलं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. राहुल गांधी तो कसा सांभाळतील याबाबत काँग्रेसच नव्हे तर, देशासह जगभरातील राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.