नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर, पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील कृतीबद्दल चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दुपारी 4 वाजता सीडब्ल्यूसीची बैठक बोलावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन


काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, वरिष्ठ नेत्यांच्या राजीनाम्याची बातमी खोटी आहे. या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती.


सुरजेवाला म्हणाले की, कथित राजीनाम्याचे वृत्त, अज्ञात स्त्रोतांच्या आधारे, पूर्णपणे अवास्तव, खोडसाळ आणि खोटे आहे.


पराभवानंतर मंथन


काँग्रेसची धोरण ठरवणारी संस्था CWC ची बैठक अशा वेळी होणार आहे जेव्हा काँग्रेसला पंजाबमध्ये सत्ता गमवावी लागली होती आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.


मतांची टक्केवारी घसरली


काँग्रेसला उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांपैकी 2.33% मतांसह फक्त 2 जागा जिंकता आल्या आणि त्यांच्या बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. उत्तर प्रदेशच्या प्रभारी AICC सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करूनही पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही.