`...मग मोदी ओबीसी कसे?` - राहुल गांधी
Rahul Gandhi on PM Narendra modi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील सत्ताधारी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच विरोध गटसुद्धा त्यांच्या परिनं आखणी करताना दिसत आहे.
Rahul Gandhi on PM Narendra modi : भारत जोडो यात्रेच्या पुढच्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता राहुल गांधी यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे नागपुरातील दिघोरी येथे झालेल्या सभेमुळं, तिथं केलेल्या वक्तव्यामुळं. काँग्रेसच्या 139 व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी नागपुरात राहुल गांधी आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. दिघोरीतील सभेमध्ये राहुल गांधी यांनी भाजपवर कडाडून टीका केली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून राहुल गांधी यांनी काही सवालही केले, आता या प्रश्नांना भाजपकडून नेमकं कसं उत्तर मिळणार हे येता काळच ठरवणार आहे.
जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पेटला...
देशातील नागरिक आणि सर्व सामाजिक घटकांना समान हक्क मिळण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, याच मागणीमुळं पंतप्रधानांनी आपलं वक्तव्य बदललं असून सुरुवातीला ते स्वत:ला ओबीसी म्हणवत होते. आता देशात गरीब ही एकच जात असल्याचं ते सांगतात; असेल आणि देशात गरीब ही एकमेव जात असेल तर मोदी ओबीसी कसे? असा बोचरा सवाल त्यांनी केला.
देशाच्या प्रशासकीय कारभाराचा उल्लेख करताना सत्तेसह प्रशासनामध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासींना कमी वाटा मिळतो, किंबहुना इतरही क्षेत्रांत या घटकांना कमी स्थान मिळतं. ज्यामुळं काँग्रेसकडून जातनिहाय जनहणनेची मागणी केली आणि तिथं मोदींचेही शब्द बदलले. पंतप्रधान स्वत:ला ओबीसी म्हणवून घेण्याऐवजी आता देशात गरीब हीच जात असल्याचं सांगतात असा टीकेचा सूर आळत काँग्रेस सत्तेस आल्यास जातनिहाय जनगणना करण्यात येईल असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं.
हेसुद्धा वाचा : भाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल
देशातील तरुणाईच्या हाती रोगजार नसून, भाजपला हे काम जमलेलं नाही ही बाब अधोरेखित करत काँग्रेसकडून हे काम प्राधान्यानं केलं जाईल असंही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र आणि देशाच्या परिवर्तनाचा मुद्दा उचलून धरत त्यांनी गरीब आणि अब्जाधीश भारत आम्हाला नकोय, असं स्पष्ट केलं. भाजप सरकारनं देशातील कोट्यवधी जनतेला गरीबीच्या छायेत लोटल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.