...तर राहुल गांधी सामोरे जातील का या तिखट प्रश्नांना ?
एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरले तर राहुल गांधींना काही तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
मुंबई : गुजरात निवडणूकचे मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. यांच्या अंदाजातून कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधींसाठी वाईट बातम्या येत आहेत.
जीवतोड मेहनत आणि जातीय समीकरणांनंतरही हिमाचलमध्ये राहुल कॉंग्रेसची सत्ता जात असून गुजरातमध्येही खास फायदा होत नसल्याचा अंदाज व्यक्त होतोय.
उत्तर द्यावे लागणार
कॉंग्रेस अध्यक्ष बनण्याआधी राहुल गांधी गुजरात निवडणुकीच्या तयारीसाठी ज्या पद्धतीने उतरले कौतुकास्पद होते. पण एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरले तर राहुल गांधींना काही तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
जबाबदारीपासून कसे वाचणार ?
राहुल गांधी जिथे जातात तिथे हरतातच अशी टीका त्यांचे विरोधक नेहमी करत असतात. पण राहूलच्या उपस्थितीत कॉंग्रेस अध्यक्षपद सोनिया गांधींकडे असताना ही पार्टीची हार मानली जायची अशी टीकाही होत असते.
आता गुजरात आणि हिमाचलमध्ये कॉंग्रेसची हार झाल्यास थेट त्यांची हार मानली जाईल. पार्टीत ठेवा, अध्यक्ष बनवा काहीही करा पण राहूल आहेत तिथे हार आहे अशी टीकाही केली जाऊ शकते.
प्रतिमा सुधारली तरीही प्रश्नचिन्ह का ?
गेल्या काही दिवसात राहुल गांधीची देहबोली बदलल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास आला आहे. त्यांच बोलण, प्रश्नांची उत्तर देणं, हजरजबाबीपणा यामध्येही सकारात्मक बदल झालाय.
या बदलाला एका मूल्यमापनाची गरज आहे. पण एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेसला तुलनेत यश कमी आहे. गुजरात निवडणूकीतही राहुल यांच्या बदलत्या देहबोलीचे मुल्यमापन होत नाहीए.
नव्या सेनापतीवर विश्वास कसा ठेवणार ?
गुजरात निवडणूक जिंकण जेवढ राहूल यांच्यासाठी महत्त्वाचे आहे तेवढच पार्टीमध्ये स्वत:ची इमेज बनवणंही आहे. यासाठी त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.
गुजरातमध्ये जिंकता न आल्यास बाकीच्या राज्यात ते पार्टी कार्यकर्त्यांना कसे विश्वासात घेणार ? हा मोठा प्रश्न आहे.
राज्यस्थान, मध्य प्रदेशमसारख्या राज्यात नवे नेते पुढे येत आहेत. स्वत: जिंकून दाखवले तरच ते दुसऱ्याच्या जिंकण्याची गॅरंटी मागू शकतील.
पार्टी अंतर्गत विरोध
राहुल स्टाईल राजकारणामूळे अनेक नेत्याचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. पार्टीच्या अंतर्गत असंतोषही खदखदण्याची चिन्हे आहेत.
'सोनिया लाओ, कॉंग्रेस बचाओ' असे नारेदेखील दिले जाऊ शकतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणे राहुल गांधींसमोरचे आव्हान आहे.
विरोधी कोणत्या आधारे मानतील नेता ?
गुजरात निवडणूकीच्या ठीक एका वर्षांनी २०१८ ला साधारण निवडणूकीसाठी राजनिती उभी करण्याची वेळ आहे. त्यामूळे राहुल यांचे जिंकणे हेच विरोधक आणि मोदी असंतुष्टांना एक पर्याय देऊ शकते.