नवी दिल्‍ली : लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडला गेला. या दरम्यान काँग्रेसकडून सगळ्यात आधी राहुल गांधी यांना बोलण्याची संधी मिळाली. लोकसभेत आपल्या भाषणाजदरम्यान राहुल गांधींनी सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींवर टीका केली. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याचं आश्वासन त्यांनी मोदींना आठवण करुन दिलं. राहुल गांधी यांनी भाजप सरकारला खोट्या आश्वासनांचं सरकार असल्याचं म्हटलं आहे. देशातील युवकांना मोदींवर विश्वान नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. 


राहुल गांधी यांनी काय म्हटलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठून मॅसेज मिळाला की त्यांनी रात्री 8 वाजता नोटबंदीचा निर्णय घेतला.


- सूरतच्या लोकांनी मला सांगितलं की, मोदींनी त्यांना खूप मोठी वेदना दिली.


- भारतात 4 वर्षामध्ये 2 कोटी नाही तर 4 लाख युवकांना रोजगार मिळाला.


- जीएसटी काँग्रेसने आणली होती तेव्हा भाजपने त्याला विरोध केला होता. आता काँग्रेसच्या मार्गावरच मोदी सरकार जात आहे.


- पीएम मोदींचा जीएसटी वेगळा आहे. या जीएसटीने छोट्या दुकानदारांना बर्बाद केलं.


- चीन 50 हजार युवकांना 24 तासात रोजगार देते. पंतप्रधान मोदी 400 युवकांना देतात.


- फक्त मोठ्या उद्योगपतींसाठी पंतप्रधान मोदी काम करतात.


- आम्हाला एकच जीएसटी हवा होता. पंतप्रधान 5 जीएसटी घेऊन आले.


- पीएमच्या दबावात संरक्षण मंत्र्यांनी देशाला खोटी माहिती दिली.


- कोणासाठी हे खोटं बोललं जातंय याची माहिती देशाला दिली पाहिजे.


- पंतप्रधानांनी म्हटलं होतं की, मी चौकीदार आहे पण अमित शाहांच्या मुलांची संपत्ती वाढली तर त्यावर ते काही नाही बोलले.


- पीएम फ्रान्सला गेले आणि जादू करत विमानाच्या किंमती 1600 कोटी केल्या. 


- पंतप्रधानांनी एका उद्योगपतीला 45 हजार कोटींचा फायदा करुन दिला. 


- पीएम मोदी हसत आहेत. पण मला कल्पना आहे की ते नर्वस आहेत.


राहुल गांधी यांनी भाषणादरम्याने पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर भाजप खासदारांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. यानंतर लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. काही मिनिटासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.