Rahul Gandhi On Hindu controversy : राहुल गांधी यांच्या हिंदू वक्तव्यावरून संसदेमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत अहिंसेचा देश असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जे स्वत:ला हिंदू समजतात ते हिंसा, द्वेष परवणं आणि असत्य गोष्टी करत आहेत, असा टोला लगावला. तर संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक बोलणं गंभीर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केला. त्याला राहुल गांधींनी पलटवार करताना नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस संपूर्ण हिंदू समाज नसल्याचं म्हटलंय.


नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात त्यांना 24 तास हिंसाचार, हिंसाचार, हिंसाचार हवा असतो; द्वेष, द्वेष, द्वेष; खोटे, खोटे, खोटे बोलत राहा. अशी लोक मुळातच हिंदू नाहीत. त्यामुळे तुम्ही अजिबात हिंदू नाहीत. सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. सत्यापासून मागे हटता कामा नये, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.



पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर


राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना मोदींनी मध्येच उभा राहुल राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे, असं मोदी म्हणाले. त्यावर मी हिंदू समाजाला हिंसक नाही तर भाजपला हिंसक म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हा संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर मोदींनी म्हटलं की, याच संविधानाने मला शिकवलंय की विरोधी पक्षनेत्याला गांभिर्याने घेणं गरजेचं आहे.


दरम्यान, राहुल गांधी यांनी भाषण करताना भगवान शंकराचा फोटो दाखवला. राहुल गांधी फोटो दाखवत असताना संसदेचा कॅमेरा लोकसभा स्पिकर ओम बिर्ला यांच्याकडे कॅमेरा वळवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी यावर आक्षेप घेतला अन् काही सेकंदासाठी पुन्हा कॅमेऱ्यामध्ये राहुल गांधीवर टिपला गेला. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.