नवी दिल्ली : पंजाब सरकारनं सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी अंमली पदार्थ सेवन (डोप) चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये वाढत चाललेल्या नशेबाजीला रोखण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मोठे निर्णय घेत आहेत. यातलाच हा निर्णय आहे. ही डोप टेस्ट वर्षातून एकदा करण्यात येणार आहे. राज्यभरात नशेबाजीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात येत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतलेल्या या निर्णयावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. डोप टेस्ट झाली पाहिजे पण त्या नेत्यांचीही डोप टेस्ट करा ज्यांनी पंजाबच्या ७० टक्के लोकांना नशेबाज म्हणलं होतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि पंजाबच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी कोकीनचं सेवन करतात.  त्यांची डोप टेस्ट केली पाहिजे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. राहुल गांधींची वक्तव्यं पाहून ते शुद्धीत नसतात हे लक्षात येतं. राहुल गांधी व्यसनाधिन आहेत, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.