नवी दिल्ली : खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश मोदी सरकारने निर्माण केलेली अनेक संकटं आज झेलत आहे. त्यापैकीच गरजेचं नसलेलं खासगीकरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 



देशातल्या तरुणाला नोकरी हवी आहे, पण मोदी सरकार सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन रोजगार आणि ठेवी भांडवल नष्ट करत आहे. फायदा कोणाचा? फक्त मोदींच्या खास मित्रांचा विकास करण्यासाठी हे होत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. खासगीकरण थांबवा आणि सरकारी नोकऱ्या वाचवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.