नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज एक भावूक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या एका जुन्या मित्राच्या आठवणीला उजळणी दिली. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांची एका नक्षलवादी हल्ल्यात हत्या घडवून आणण्यात आली होती. राहुल गांधींचा हा मित्र म्हणजे नंद कुमार पटेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच वर्षांपूर्वी याच दिवशी मी माझा मित्र नंद कुमार पटेल यांना छत्तीसगडमध्ये झालेल्या एका भयानक नक्षलवादी हल्ल्यात गमावलं. यामध्ये ज्येष्ठ नेते व्ही सी शुक्ला, महेंद्र कर्मासहीत आमचे अनेक सहकारी शहीद आणि जखमी झाले होते, असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.  



राहुल गांधी यांचं हे ट्विट सोशल मीडियावर शेअर आणि लाईक केलं गेलं.