नवी दिल्ली: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी वाटाघाटी आणि आघाडी करण्याबाबतचे सर्वाधिकार काँग्रेस कार्यकारिणीनं पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलेत. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून, राहुल गांधी त्यासाठी पुढाकार घेणार आहेत.


राहुल गांधींकडून नेत्यांना गर्भित इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींनी करावे, असा सूर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मी मोठी लढाई लढतोय. प्रत्येकाला पक्षाच्या व्यासपीठावर मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण ती लढाई जिंकण्यामध्ये अडथळा ठरेल अशी भूमिका जो कुणी मांडेल, त्याच्यावर कारवाई करायला आपण मागेपुढं पाहणार नाही, असा इशाराही राहुल गांधींनी या बैठकीत दिल्याचं समजतं.


मोदी सरकारची उलटगणती सुरू


दरम्यान, मोदी सरकारची उलटी गणती सुरू आहे, अशी टीका काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी यावेळी केली.