Rahul Gandhi Disqualification : मोदी आडनावावरून (Modi Surname) केलेल्या टिप्पणीच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी सुरत सत्र न्यायालयात (surat court) याचिका दाखल करणार आहेत. अकरा दिवसांनंतर राहुल गांधी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. यासोबत नियमित जामिनासाठी राहुल गांधी न्यायालयात अर्जही दाखल करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात राहुल गांधी सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मानहानीच्या खटल्यातील प्रकरणात झालेल्या शिक्षेविरोधात राहुल 11 दिवसांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. यासोबतच ते नियमित जामिनासाठी कोर्टात अर्जही दाखल करणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू देखील कोर्टात येण्याची शक्यता आहे. यासोबतच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही राहुल गांधी यांच्यासोबत कोर्टात येण्याची शक्यता आहे.


मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीच्या प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयाने राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अकरा दिवसांनंतर राहुल गांधी यांनी शिक्षेविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे.


कोणत्या प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा झाली?


राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथे एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून एक टिप्पणी केली होती. यानंतर भाजपच्या पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तसेच दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरले होते.


कोण आहेत पूर्णेश मोदी?


गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सूरत सेशन कोर्टात ही याचिका दाखल केली होती. राहुल यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण मोदी समाजाचा अपमान झाल्याची तक्रार त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.


पूर्णेश मोदी गुजरात राज्यातील सूरत शहरातील अदजान परिसरात राहातात. 2013 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 2013 मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई यांचा आजारपणामुळे निधन झाल्याने पोटनिवडणूक पार पडली होती. यामध्ये भाजपकडून पूर्णेश मोदी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होते. पूर्णेश मोदी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. 


त्यानंतर 2017 विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदी यांनी पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि पूर्णेश मोदी पुन्हा एकदा विजयी झाले. गुजरात सरकारमध्ये पूर्णेश मोदी यांनी स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण समिती सदस्य म्हणून 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 महत्त्वाची भूमिका सांभाळली.