अध्यक्षपद निवडणुकीसाठी राहुल गांधी आज भरणार अर्ज
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्यासह पक्षातील मोठे नेते आणि काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख असून आतापर्यंत कुणीही राहुल गांधीविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे ५ डिसेंबरनंतर राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.
राहुल गांधीनी निवडणूक लढवण्यासाठी पत्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि वर्कींग कमिटी सदस्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असं पत्र पाठवलं आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, पंतगराव कदम यांच्यासह अन्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी त्यावर अनुमोदनपर सही केली आहे. आज राहुल गांधी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष निवडणूक पदाबाबत अर्ज दाखल करतील, अशी माहिती सुशील कुमार शिंदे यांनी दिली.