नवी दिल्ली : पाच राज्यातल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता काँग्रेस आणि भाजपामधल्या शाब्दिक चकमकींचा धुरळा उडालाय. आज मतदान होत छत्तीसगडमधील जगदलपूर मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेवटची सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधींनी 'पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये..' असे म्हटले. आपला हा मुद्दा स्पष्ट करताना राहुल गांधींनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. 'काँग्रेसचे नेते इंग्रजांशी लढत असताना सावरकरजी इंग्रजांची हात जोडून प्रार्थना करत होते' असं ते म्हणाले.


मतदानाला सुरूवात  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील अठरा विधासभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे.


- यात बहुतांश मतदारसंघ नक्षलग्रस्त भागातील असल्याने सुरक्षेची प्रचंड काळजी घेण्यात आलीय. 


- बस्तरच्या १२ मतदारसंघात एक लाखांपेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत.


पंतप्रधानांचा कार्यक्रम 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय. येत्या १६ तारखेपासून २५ तारखेपर्यंतच्या काळात मध्यप्रदेशातल्या विविध जिल्ह्यात मोदी प्रचार सभा घेतील. २८ तारखेला मध्यप्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.


जाहीर कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ नोव्हेंबर ग्वाल्हेर आणि शहाडोलमध्ये तर १८ नोव्हेंबरला मोदी छिंदवाडा आणि इंदूरमध्ये जाहीर सभा घेतील.


२० नोव्हेंबरला झाबुवा आणि रिवा जिल्ह्याच्या शहारांमध्ये मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.


२३ नोव्हेंबरला मंदसौर आणि छतरपूरमध्ये तर २५ नोव्हेंबरला मोदींच्या दोन सभा होतील. त्यातली पहिली सभा विदिशा इथे तर दुसरी सभा जबलपूरमध्ये होणार आहे.