अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संघावर जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्यावरील आरोपांवरून राहुल यांनी मोदींना चौकीदार संबोधून पुन्हा लक्ष्य केलं. तसंच बेटी बचाओ, बेटी पढाओ या सरकारच्या अभियानावरूनही राहुल यांनी अमित शाहांची खिल्ली उडवत के बेटे को बचाओ असा टोला हाणला..राहुल गांधी यांनी यावेळी संघालाही लक्ष्य केलं. महिला सक्षमीकरणाच्या बढाया मारणाऱ्या संघात मात्र महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 


भाजपनं जोरदार प्रत्युत्तर


आगामी गुजरात विधानसभा निव़डणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र उत्तर देण्यासाठी गुजरात नव्हे तर राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीची निवड करण्यात आली. 


भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. गेल्या निवडणुकीत पराभव झालेला असतानाही स्मृती इराणी अमेठीचा वारंवार दौरा करतात. मात्र राहुल गांधी खासदार असूनही अमेठीकडे फिरकतही नसल्याचा आरोप शाहांनी केला.