नवी दिल्ली : कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक फोटो शेअर केलाय. या फोटोमुळे ते वादात अडकले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाला सेनेच्या 'डॉग युनिट' च्या योग कार्यक्रमाशी जोडणारा फोटो शेअर केला आहे. सरकारवर निशाणा साधत हा 'न्यू इंडिया' असल्याचा टोला लगावला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताच युजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. राहुल यांनी भाजपा आणि सरकारवर निशाणा साधण्याच्या नादात सेना आणि योगा दिनाची खिल्ली उडवल्याचे युजर्स म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



राहुल यांनी ट्विटरवर डॉग युनिट च्या योग कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आणि न्यू इंडिया असे लिहिले. या फोटोमध्ये डॉग युनिटमधील डॉग आणि या युनिटशी संबंधित जवान एकत्र योग मुद्रेत दिसत आहेत. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी रांची आणि विविध ठिकाणच्या कार्यक्रमात हिस्सा घेतला. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर लोकांनी त्यांचीच खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.