मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, राहुल शेवाळेंसह अन्य खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी
मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical Language) दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical Language) दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे गटात काही दिवसांपूर्वी दाखल झालेले राहुल शेवाळे (Rahul Shwale) आणि अन्य खासदारांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. (rahul shewale and other mps request union home minister amit shah to give marathi status of classical language)
शेवाळे काय म्हणाले?
"आता शिवसेनेचे बहुतांश खासदार हे एनडीएत (NDA)आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही मराठी भाषा अस्मितेचा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलंय", असं शेवाळे यांनी यावेळेस स्पष्ट केलं. तसेच गृहमंत्री शाह यांनीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आश्वासन दिलंय, असंही शेवाळे यांनी नमूद केलं.
राज्य सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले होते?
"गृह, सांस्कृतिक आणि शिक्षण या 3 मंत्रालयात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ जावा लागतो. सध्या हा विषय साहित्य अकादमीकडे आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल", असं उत्तर राज्य सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत काही महिन्यांपूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिलं होतं. गृहमंत्र्यांनी मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत आश्वासन दिल्याने समस्त मराठीजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान मुंबईतील दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत पालिकेने येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी पालिकेने 31 मे पर्यंत मुदत दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी दुकानदारांच्या मागणीनंतर पालिकेकडून पुन्हा मुदतवाढ दिल्याने दिलासा मिळाला आहे.