मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरची सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. डेप्युटी मॅनेजर पदासाठी जागा रिक्त असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड करण्यात येईल. मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, गुरुग्राम आणि हैद्राबाद आणि सिकंदराबाद येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपयांचा बॉन्ड साईन करावा लागेल. त्या बॉन्ड अंतर्गत उमेदवाराला RailTel मध्ये ३ वर्ष नोकरी करावी लागेल. यापूर्वी नोकरी सोडून जाणाऱ्या उमेदवाराला २ लाख रुपये कंपनीला द्यावे लागतील.


  • वेबसाईट- www.railtelindia.com

  • रिक्त जागा- 08

  • पद- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

  • पगार- 40,000 ते 1,40,000 रुपये. बेसिक सॅलरीच्या 3% अॅन्युअल इंक्रीमेंट ( वार्षिक पगारवाढ) होईल. 

  • शैक्षणिक योग्यता- मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/ बीटेक/ बीएससी

  • वयोमर्यादा- जास्तीत जास्त २८ वर्ष

  • अर्ज शुल्क- 500 / 250 रुपये (वर्गानुसार)


अर्ज करण्याची प्रक्रिया


या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर जा. दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी उमेदवार अर्जाची प्रिंटआऊट अवश्य घ्या.


अधिक माहितीसाठी-


https://safalta.com/job-alert/