मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्यांचे कोच आणि केबिन्स आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलण्यावर विचार केलायं. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डानं सरकारसमोर ठेवल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वे १३ हजार ५२३ गाड्या दिवसाला चालवते. मात्र सर्व पॅसेंजर ट्रेन्स आणि इतर रेल्वे गाड्या १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्यात. त्यामुळे नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या बैठकीत रेल्वेकडून हा प्रस्ताव देण्यात आल्याचं कळतंय. गरज भासल्यास रेल्वेकडून ही मदत पूरवली जाणार आहे.


रुग्ण संख्येत वाढ 


आतापर्यंत देशात कोरोनाचे ६०६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १० जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १२३ तर मुंबईत रुग्णांची संख्या पन्नाशीपार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. 


गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.  


मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.  


यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.


टोलवसुली स्थगित 


केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे. 


देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.


देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.


कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.