नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूचे भयंकर रूप पाहता भारतीय रेल्वेही सहकार्यासाठी पुढे आली आहे. देशभरात कोरोना आजारांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने रेल्वेचे डब्यांना कोरोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी तयार केले आहेत. सध्या रेल्वेकडे 4002 असे कोच आहेत, जे कोविड कोचमध्ये बदलण्यात आले आहेत. रेल्वेचे हे कोच ऑन-द-गो हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाले आहेत. हे एकाच वेळी 64,000 रूग्णांची काळजी घेऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने 4000 कोविड कोच तयार करण्यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे कोच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे तैनात असतील. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण या चार राज्यात आहेत. यामुळे या राज्यांच्या रुग्णालयांमध्ये बेड फूल झाले आहेत. गंभीर रूग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळत नाहीये. रेल्वे हे डबे वेगवेगळ्या झोनमध्ये तैनात करणार आहेत जेणेकरून आवश्यक असल्यास ते त्वरित वापरता येतील.


रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ट्विट केले की, भारतीय रेल्वेने भोपाळ (मध्य प्रदेश) येथे 20 कोविड केअर कोचची व्यवस्था केली असून यामध्ये 320 बेड असतील. हे कोच 25 एप्रिलपासून काम सुरू करतील. 4,002 ट्रेनचे डबे कोविड केअर आणि आयसोलेशन कोचमध्ये रूपांतरित केले गेले आहेत. राज्य सरकारांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2000 रेल्वे डब्यांना कोविड केअर केंद्रांमध्ये रूपांतरित केले आहे.