उद्यापासून पुन्हा सुरु होणार e-Catering, ऑनलाईन ऑर्डर करा जेवण
कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर IRCTC ने e-catering सुविधा सुरु
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. १ फेब्रुवारीपासून ट्रेनमध्ये e-catering सेवा पुन्हा सुरु होणार आहे. IRCTC ने ट्टवीट करुन यासंदर्भात माहिती दिली. निवडक स्थानकांवर ही सुविधा सुरु असणार आहे. कोरोना संकटामुळे मागच्या वर्षी मार्चपासून e-catering सुविधा बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना फार अडचणीचा सामना करावा लागत होता. आता देशभरात कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर IRCTC ने e-catering सुविधा सुरु केली आहे.
कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून सुरक्षेसंदर्भात नियमांचे पालन करत ही सेवा सुरु केली जाणार आहे.
e-catering साठी गाईडलाईन्स
e-catering संदर्भात सर्व कर्मचार्यांना कोविड १९ च्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जेवण बनवताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. जे लोक काही कारणामुळे स्वत:च्या घरुन जेवण आणू शकत नाहीत अशांसाठी ही सुविधा असते. तसेच प्रवाशांना घरुन जेवण आणण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसणार आहे.
प्रवासादरम्यान अनेकदा जेवणासंदर्भात अडचणी येतात. आता e-catering सुविधा सुरु झाल्यानंतर IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही बुकींग करु शकता. प्रवाशांना आपला पीएनआर नंबर, ट्रेन नंबर, सीट नंबरसारखी महत्वाची माहिती द्यावी लागणार आहे.