नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत असतानाच आता ट्रेनमधीन अन्न देखील महाग झालं आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम (IRCTC)ने शताब्दी, राजधानी आणि दुरंतो या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन दरांबाबत आयआरसीटीसीने परिपत्रक जारी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ दिवसांमध्ये हे दर तिकीट प्रणालीमध्ये दाखल होणार आहेत आणि २ महिन्यांनंतर हे दर लागू करण्यात येणार आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवनापर्यंतचे दर वाढवण्यात आले आहेत. 


शताब्दी, राजधानी आणि दुरंतो सारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये चहा त्याचप्रमाणे जेवनाच्या किंमती वाढल्या आहेत. 
- द्वितीय एसी वर्गात १० रूपयाच्या चहासाठी आता २० रूपये मोजावे लागणार आहेत. 
- स्लिपर एसी वर्गात १० रूपयाच्या चहासाठी आता १५ रूपये मोजावे लागणार आहेत. 
- दुरंतो एक्सप्रेसमध्ये दुपारचं आणि रात्रीच्या जेवनासाठी १२० रूपये मोजावे लागणार आहेत. याआधी जेवन ८० रूपयांत मिळत होतं. 


१ AC/EC
- सकाळचा चहा १५ रूपयांवरून ३५ रूपये झाला.
- संध्याकाळचा चहा ७५ रूपयांवरून १४० रूपये झाला आहे. 
- नाश्ता ९० रूपयांवरून १४० रूपये झाला आहे. 
- दुपारचं आणि रात्रीचं जेवन १४५ रूपयांवरून २४५ रूपये झालं आहे. 


2 AC/3AC/CC
- सकाळचा चहा १० रूपयांवरून २० रूपये झाला आहे. 
- नाश्ता ७५ रूपयांवरून १०५ रूपये झाला आहे. 
- दुपारचं आणि रात्रीचं जेवन १२५ रूपयांवरून १८५ रूपये, तर संध्याकाळचा चहा ४५ रूपयांवरून ९० रूपये झाला. 


हे नवे वाढीव दर १५ जानेवारी २०२० पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या नव्या वर्षी प्रवाश्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे.