Railways : रेल्वे तिकीटात ज्येष्ठ नागरिकांना सवलत... रेल्वेमंत्र्यांनी सांगितला नवा नियम
Railways Ticket Concesation : रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सबसिडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी व्यक्तीसाठी सरासरी 53 टक्के सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, संसदीय समितीने शिफारस केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटावरील सवलत पुन्हा लागू...
Indian Railways Ticket Concesation : कोरोना काळात रेल्वेचे नियम बदलले. त्यामुळे अनेक सवलती बंद झाल्या होत्या. आता हळूहळू काही सवलती लागू करण्यात येत आहेत. दरम्यान, रेल्वे प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत मिळत नाही. ही सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सवलतीबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवा नियम सांगितला आहे. त्यामुळे ही सवलत मिळणार की नाही याची उत्सुकता आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यसभेत लेखी उत्तर दिलेय. त्यांनी स्पष्ट केले आहे की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करु शकते. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिलेली ही सवलत कोरोनामुळे थांबवली होती. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतीय रेल्वेने 2019 -2020 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांचे अनुदान (Subsidy) देण्यात आले आहे.
स्लीपर, एसी थ्री टायरमध्ये सवलत लागू करणार?
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सबसिडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी व्यक्तीसाठी सरासरी 53 टक्के सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, संसदीय समितीने शिफारस केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटावरील सवलत पुन्हा लागू करावी. या सवलतीबाबत केंद्राची काय भूमिका आहे, असा लेखी सवाल वैष्णव यांना विचारण्यात आला होता.
या सवलीबाबत रेल्वेच्या स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि एसी 3 मध्ये सवलत देण्याचा आढावा घेण्याचा आणि विचार करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले होते, तिकिट भाड्यात सवलत देता येणार नाही. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले होते की, रेल्वेचे पेन्शन आणि पगाराचे बिल खूप जास्त आहे.
कोरोना काळात रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व प्रवासी गाड्यांचे संचालन बंद केले होते. आता केंद्रीय संसदीय समितीच्या आवाहनावर रेल्वे मंत्रालयाने विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट पुन्हा बहाल केली जाऊ शकते. तसे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, कधीपासून ही सवलत लागू होईल, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.