नवी दिल्ली : नवी दिल्ली ते अंबाला रेल्वे स्टेशनवरील रक्कम घेऊन अंबाला येथे (तिजोरी-36904) पॅसेंजर ट्रेनमधून ती उतरवलीच गेली नाही. त्यानंतर ती सरळ कालका येथे पोहोचली. ही तिजोरी कालका रेल्वे स्टेशनवर अनेक महिने पडून होती. त्यानंतर नोटबंदी झाली. अनेक महिन्यानंतर अधिकाऱ्यांना तिजोरी आठवली. जेव्हा त्याला उघडण्यात आली. तेव्हा त्यातून 500 आणि 1000 च्या नोटा निघाल्या. पण त्या सर्व खराब झाल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर २०२० च्या प्रकरणच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. अंबाला येथे तेव्हा कोण ड्युटीवर होतं. याची चौकशी सुरु आहे. 25 ऑक्टोबर 2016 ला दिल्ली ते अंबाला पॅसेंजर ट्रेन नंबर 54303 मध्ये तिजोरी ठेवण्यात आली होती. छोट्या रेल्वे स्टेशनवरुन बुकिंग, पार्सलची कॅश तिजोरीमध्ये सील केली गेली. गार्ड सोबत एंट्री करणारे कर्मचाऱ्याचे हस्ताक्षर केले जायचे. ही तिजोरी सगळ्या स्थानकावरुन कॅश घेतल्यानंतर दिल्लीला पोहोचते.


दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती उघडली जायची. 25 ऑक्टोबरला ही तिजोरी अंबाला ऐवजी कालकाला पोहोचली. त्यानंतर अधिकाऱ्यांना कळालं की, दिल्ली ते अंबाला दरम्यान जमा केलेली कॅश जमाच केली गेली नाही. तेव्हा तिजोरीचा शोध सुरु झाला. त्यानंतर ती उघडण्यात आली. ज्यामध्ये जवळपास तीन लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. पण 500 आणि 1000 च्या नोटा खराब झाल्या होत्या.


बातमी : आफ्रिकेमध्ये विचित्र आजाराचा फैलाव, माणसाचा तडकाफडकी अंत