Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यावर हात शेकत आहेत. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी अलीगढच्या येथे ट्रेन थांबवून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. 


दोन्ही युवकांची चौकशी केल्यानंतर व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ट्रेन पुढे रवाना झाली. पण या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपर्क क्रांती एक्स्प्रेस सिलचरहून नवी दिल्लीकडे जात असताना ट्रेनने बरहन क्रॉसिंगच्या जवळ असताना गेटमॅनने टेनच्या जनरल कोचमधून धुर येताना पाहिले. त्याने लगेचच त्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानंतर लगेचच याची सूचना आरपीएफ अधिकाऱ्यांना दिली. 


अधिकाऱ्यांनी चमरौला रेल्वे स्थानकात थांबवून जनरल कोचची तपासणी केल्यानंतर दोन लोकांसह 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. अलीगढ आरपीएफ पोस्ट कमांडर राजीव वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधून धुर येण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी व पोलिसांनी रेल्वे स्थानकात ट्रेन थांबवून जनरल कोचची पाहणी केल्यानंतर काही जण शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्याची शेकोटी केली होती. त्यावर काही जण हात शेकत होते. पोलिसांनी त्यानंतर सगळ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या लगेचच निदर्शनास आल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. 


अलीगढ रेल्वे स्थानकात आरपीएफ ठाण्यात दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात त्यांचा काहीच सहभाग नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांना ताकिद देऊन सोडून देण्यात आले आहे.