मुंबई : तुम्ही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. उत्तर रेल्वेने सेंट्रल हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे वरिष्ठ निवासी योजनेअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे आणि याबाबत त्यांना अधिसुचना देखील जारी केली आहे. यामध्ये चांगली गोष्ट अशी की, कोणताही उमेदवार थेट इंटरव्ह्यू देऊन या पदांवर नोकरी मिळवू शकतो. म्हणजेच रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.


या दिवसात वॉक इन इंटरव्ह्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्या उमेदवाराला उत्तर रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अर्ज करायचा असेल तर तो 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये जाऊन थेट इंटरव्ह्यू देऊ शकतो. ही भरती अधिसूचना रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट nr.indianrailways.gov.in वर उपलब्ध आहे.


पद


उत्तर रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे ऍनेस्थेशियाच्या 2 पदे, ENT चे 1 पद, जनरल मेडिसिनचे 10 पद, जनरल सर्जरीचे 6 पद, मायक्रोबायोलॉजीचे 1 पद, पॅथॉलॉजीचे 1 पद आणि रेडिओलॉजीचे 1 पद भरण्यात आले आहे. तसेच इतर अनेक पदांवर भरती केली जाणार आहे.


पगार किती असेल


उत्तर रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ निवासी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये ते 2 लाख 08 हजार 700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.


ही पात्रता असणे आवश्यक आहे


वरिष्ठ निवासी पदावरील भरतीसाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील पोस्ट ग्रेजुएशन डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा


वयोमर्यादाबद्दल बोलायचे झाले तर, या पदांच्या भरतीसाठी, सर्वसाधारण आणि अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांचे वय 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
OBC प्रवर्गाचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय 42 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


इंटरव्ह्यूचे ठिकाण


उत्तर रेल्वेमधील वरिष्ठ निवासी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रांसह, नॉर्दर्न रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, पहिल्या मजल्यावरील सभागृह, नवी दिल्ली येथे इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात. सकाळी 8.30 पासून इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहेत.