Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात आहेत त्यांचासाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वेमध्ये 1659 पदांसाठी बंपर भरती  करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. रेल्वेमध्ये फिटर, प्लम्बर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcpryj.org तुम्ही ऑनलाई अर्ज करु शकता. या बंपर भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


किती पदांवर भरती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण पदं – 1659 पदं
प्रयागराजसाठी – 703 पदं
झाशीसाठी – 660 पदं
आग्रासाठी – 296 पदं 


कोण करु शकतो अर्ज?


तर या पदांसाठी दहावी पास विद्यार्थी अर्ज करु शकतात. मात्र या विद्यार्थ्यांनी आयटीआय करणे आवश्यक आहे.  तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे. शिवाय या अर्जासाठी 100 रुपये फी आहे. 


कसा करायचा हा अर्ज?


- रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट rrcpryj.org वर जा
- आता साइटवरील अप्रेंटिस भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
- हे क्लिक केल्यावर एक विंडो ओपन होईल
- या पेजवर उमेदवारांची तपशील माहिती भरा
- त्यानंतर क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा, अर्ज व्यवस्थित भरा
- यामध्ये उमेदवाऱ्यांनी आवश्यक सगळी कागपत्रे अपलोड करावी
- त्यानंतर अर्ज फी 100 रुपये भरावे
- अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावी.