Eastern Railway Recruiment: ईस्टर्न रेल्वेने अपरेंटिस पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 3115 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार RRC च्या अधिकृत वेबसाइट rrcrecruit.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 30 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. या पदांसाठीचे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच सादर केले जातील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्त जागा तपशील


  • हावडा विभाग: 659 पदे

  • लिलुआ विभाग: 612 पदे

  • सियालदह विभाग: 440 पदे

  • कांचरापारा विभाग: 187 पदे

  • मालदा विभाग: 138 पदे

  • आसनसोल विभाग: 412 पदे

  • जमालपूर कार्यशाळा: 667 पदे


या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांचं वय 15 वर्षांपेक्षा जास्त आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावं. ओपन कॅटगरीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करताना 100 रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती आणि महिला उमेदवारांना शुल्क नसणार आहे.