Railway चा शेअर 20 दिवसा डबल, गुंतवणूक करुन होऊ शकता श्रीमंत !
Rail Vikas Nigam Share Price: आज अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. मात्र, काहीना कोणते शेअर खरेदी करावे हेच कळत नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नुकसान होते. आजकाल रेल्वेच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अशाच एका रेल्वे स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना 25.16 टक्के परतावा मिळाला आहे.
Multibagger Stock RVNL : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगले पैसे कमवता येतात. मात्र, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवणायचे हेच जर माहीत नसेल तर तुमचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे अशी गुंतवणूक कताना थोडी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नुकसान होते. आजकाल रेल्वेच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. अशाच एका रेल्वे स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना 25.16 टक्के परतावा मिळाला आहे.
रेल्वे स्टॉकने गुंतवणूकदारांना गेल्या 5 दिवसात मोठा परतावा दिला आहे. या शेअरचे नाव रेल विकास निगम (RVNL Share) आहे. बुधवारी हा शेअर 130 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. पाच दिवसात कंपनीचा स्टॉक 25.16 टक्के म्हणजेच 25.80 रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी, गेल्या एका महिन्यात, स्टॉक 70.68 टक्के म्हणजेच 53.15 रुपयांपर्यंत वाढला आहे. याशिवाय, गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 152.66 टक्क्यांनी वाढला आहे. या काळात शेअरचा भाव 77.55 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांचा चांगला नफा झाला.
स्टॉकची किंमत किती वाढली?
रेल्वेच्या शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांना फायदाच झाला आहे. YTD वेळेत, स्टॉक 87.24 टक्क्यांनी वाढला आहे. 2 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर 68.55 रुपयांच्या पातळीवर होता आणि YTD वेळेत शेअर 59.80 रुपयांपर्यंत वाढला आहे.
रेल्वे विकासाचा व्यवसाय काय आहे?
रेल विकास निगम, ही कंपनी रेल्वे प्रकल्पांच्या कामात गुंतवणूक करीत असते. त्याअंतर्गत नवीन लाईन उभारणे, दुहेरीकरण, रेल्वे विद्युतीकरण, मेट्रो प्रकल्प, मोठे पूल बांधणे, कार्यशाळा, केबल स्टे ब्रिज आणि संस्था इमारती यांचा समावेश आहे.
रेल विकास निगमचा शेअर चांगली कमाई करुन देत आहे. गेल्या 20 दिवसांत शेअर्सचे भाव दुप्पट झालेत. गेल्या आठवड्यात शेअर्सचे बाजारमूल्य 20.38 टक्क्यांनी आणि गेल्या महिन्यात 67.35 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या 20 दिवसांत हा साठा दुप्पट झाला आहे. RVNL स्टॉक 10.9X च्या FY25 EV/EBITDA वर ट्रेडिंग करत आहे, जो 7.0X च्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त आहे, असे शेअर मार्केट जाणकार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
(Disclaimer: येथे फक्त स्टॉकची कामगिरी दिली आहे, यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीच्याअधीन आहे आणि तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)