Indian Railways : भारतीय रेल्वेने (indian railways) देशभरातील 130 मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट ( superfast train) दर्जा देऊन सर्व श्रेणीच्या भाड्यात (Fare) वाढ केली आहे. याअंतर्गत एसी-1 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या गाड्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी-1साठी 75 रुपये, एसी-2, 3 चेअर कारमध्ये 45 रुपये आणि स्लीपर क्लासमध्ये 30 रुपये भाडे वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पीएनआर (सहा प्रवाशांसाठी) रेल्वे तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना एसी-1 मध्ये 450 रुपये, एसी-2 मध्ये 270 रुपये, 3 आणि स्लीपर कोचमध्ये (sleeper coach) 180 रुपये अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, या सर्व गाड्यांमधील खानपान, प्रवाशांची सुरक्षा किंवा सुविधांच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. रेल्वेने या वस्तूवर एक पैसाही खर्च न करता सर्व वर्गांच्या भाड्यात वाढ केली आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, सरासरी 56 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांना वेळापत्रकात सुपरफास्टचा दर्जा देण्यात आला आहे.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय रेल्वे 45 वर्षांपासून ट्रेनचा सरासरी वेग वाढवण्यात अपयशी ठरली आहे. यामध्ये चार दशकांपासून मेल-एक्स्प्रेस गाड्यांची सरासरी वेग 50 ते 58 किमी प्रतितास आहे, तर रेल्वेच्या प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरांतो इत्यादी गाड्यांची सरासरी वेग 70-85 किमी प्रतितास आहे. 15-20 टक्केच ट्रेन कधीच त्यांच्या स्थानावर वेळेवर पोहोचतात. 60 टक्के गाड्या 15-20 मिनिटे उशिराने पोहोचतात.


2022-23च्या नवीन रेल्वे वेळापत्रकामध्ये, मोठ्या संख्येने पॅसेंजर गाड्यांना मेल-एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे या गाड्यांमधून लाखो प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत, कारण रेल्वेची झालेली भाडेवाढ. विना तिकीट प्रवास केल्यास भाडे आणि दंड दोन्ही आकारले जातील. याशिवाय मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये मूळ भाड्याव्यतिरिक्त आरक्षण शुल्क, सुपरफास्ट चार्जसह जीएसटी आकारला जातो.


म्हणजेच वेळापत्रकामध्ये दिल्ली-भटिंडा (ट्रेन क्र. 20409) पॅसेंजर ट्रेनला मेल-एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. हे प्रवासाचे अंतर 298 किमी आहे. मात्र रेल्वे नियमानुसार पॅसेंजर ट्रेन 325 किमीपर्यंत धावतात. या ट्रेनला सुपरफास्टचा दर्जाही देण्यात आला आहे. दिल्ली-सहारनपूर (ट्रेन क्र. 20411)  पॅसेंजरला मेल-एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. मात्र दिल्ली-सहारनपूर हे अंतर 181 किलोमीटर आहे. यामुळेच आता या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.