दिवाळीच्या अगोदर प्रवाशांना रेल्वेकडून मोठं गिफ्ट
नवीन बदल
मुंबई : सणाच्या दिवसांत रेल्वेने आपल्या सर्व प्रवाशांना गोड बातमी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवाळी आणि पुढील वर्षे प्रवाशांची अगदी चांगली जाणार आहेत.वर्षभरात 50 टक्क्यांहून कमी बुकिंग होणाऱ्या 15 प्रीमियम रेल्वेगाड्यांवरील फ्लेक्सी भाड्याच्या योजना समाप्त करण्यात आली आहे.
कमी मागणी असणाऱ्या काळात जेव्हा तिकिट बुकिंग 50 ते 75 टक्के घटते. तेव्हा अशा 32 गाड्यांमध्ये फ्लेक्सी योजना लागू केली जाणार नाही. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी बुधवारी सांगितले की, रेल्वेने 101 ट्रेनमध्ये फ्लेक्सी भाड्याचे दर 1.5 टक्क्यांऐवजी 1.4 टक्के केलं आहे.
रेल्वेने हा निर्णय जुलै महिन्यात आलेल्या कॅगच्या रिपोर्टनंतर घेतला आहे. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सप्टेंबर 2016 मध्ये ही योजना सुरू केल्यानंतर अनेक जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या योजनेत बदल केल्यामुळे जवळपास 103 करोड रुपये रेल्वेला नुकसान होणार आहे. अशी आशा केली जात आहे की, तिकिटीचा दर कमी केल्यामुळे सीट भरण्यास मदत होईल.
या रेल्वेच्या गाड्यांचा समावेश
कालका - नवी दिल्ली शताब्दी, हावडा - पुरी राजधानी, चैन्नई - मदुरै दुरंतो, अमृतसर शताब्दी, इंदौर दुरंतो, जयपुर दुरंतो, बिलासपुर राजधानी, काठगोदाम - आनंद विहार शताब्दी, रांची राजधानी या ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनची मागणी ज्या काळात कमी असेल तेव्हा फ्लेक्सी भाड्याची योजना लागू केली जाणार नाही.