रेल्वेच्या नव्या `सारथी` अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन `सारथी` नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे इंटिग्रेटेड 'सारथी' हे मोबाईल अॅप लॉन्च केलंय. प्रवाशांना सर्व सुविधा आणि तक्रारीसाठी हे अॅप उपयोगी पडेल, असा विश्वास सुरेश प्रभूंनी यावेळी व्यक्त केला.
'सारथी'वर उपलब्ध सुविधा
- तिकीट ई - बुकींग
- तक्रार नोंदवता येणार
- सूचना
- प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
- ई - केटरिंग
- कुली बुकिंग
- विश्रामकक्षाचं आरक्षण
- व्हिलचेअर बुकिंग
- ऑन बोर्ड क्लिनिंग - क्लीन माय कोच
- रिअल टाईम लोकेशन
- हॉटेल बुकिंग
- टॅक्सी बुकिंग
- विमानाचं तिकीट बुकिंग
- १३९ - चौकशी
- १३८ - तक्रार
- १८३ - सुरक्षा
रेल्वेचे वेगवेगळे अॅप आणि वेबसाईटला एकत्र करून सर्व सुविधा या मोबाईल अॅपवर एकाच ठिकाणी मिळतील.