२४ तासांत राजधानी करणार दोन फेऱ्या पूर्ण?
राजधानी रेल्वे २४ तासांत येणं आणि जाणं अशा दोन्ही बाजुंचा प्रवास करू शकते का? याचा रेल्वे प्रशासन सध्या धांडोळा घेत आहे.
नवी दिल्ली : राजधानी रेल्वे २४ तासांत येणं आणि जाणं अशा दोन्ही बाजुंचा प्रवास करू शकते का? याचा रेल्वे प्रशासन सध्या धांडोळा घेत आहे.
रेल्वेची साफ-सफाई आणि इतर तयाऱ्यांसाठी दोन्ही प्रवासांत अर्ध्या तासाचं अंतर असेल. या पद्धतीच्या आणखी काही प्लानवर १६ डिसेंबर रोजी 'संपर्क, समन्वय आणि संवाद' कार्यक्रमात चर्चा होईल. या बैठकीत रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या दरम्यान २०२२ पर्यंत एक रोडमॅप तयार केला जाणार आहे.
वेळेच्या सुधारणांसोबतच सुरक्षेच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्लान आणि नव्या कल्पनांसहीत या बैठकीत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आलेत.