मुंबई : भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज पाहता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वच्छता, सजावट आणि आवश्यक गरजा लक्षात घेता लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्समध्ये हे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये १४ राजधानी आणि १५ शताब्दी एक्सप्रेसचा समावेश करण्यात  आला आहे.  



 



 काय आहेत नवे बदल ? 


 
 डोळ्यांना शांत वाटणारी खास पेटिंग आणि रंगाकामाचा समावेश करण्यात आला आहे. 


 
 स्वच्छ शौचालय  


भरतीय रेल्वेतील स्वच्छतागृहांमध्ये आता 'ऑटो जनरेटर' प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणार आहे. 


 


एलईडी लाईट्स 


रेल्वेमध्ये आता एलईडी लाईट्सचा वापर करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेतील आरशांवरही एलईडी बल्ब लावले जातील. 


 


सीसीटीव्ही कॅमेरे 


रेल्वेतील सुरक्षा वाढवण्यासाठी आता सीसीटीव्हीदेखील लावण्यात येणार आहेत. दरवाज्याच्या भागामध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. 


नाईट लाईट 


रात्रीच्या वेळेस बर्थ कोठे आहे ? हे पाहता यावे याकरिता खास लाईट्सचा वापर करण्यात  येणार आहे.