Varanasi Street Dog Jaya: भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि वाढते हल्ले यामुळं महाराष्ट्रासह भारतात वातावरण तापलं आहे. वाघ-बकरी चहाच्या मालकाचा भटक्या कुत्र्यामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. मात्र, उत्तप प्रदेशच्या गल्लीबोळात फिरणाऱ्या एका भटक्या श्वानाचे नशीब चमकले आहे. वाराणसीच्या गल्लीत फिरणारी श्वान जया आता नेदरलँडला जाणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी जया दिल्लीहून एम्सटर्डमच्या विमानाने रवाना होणार आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँड येथे राहणारी Meral Bontenvel मागील वर्षी बनारस येथे फिरण्यासाठी आली होती. तेव्हा गल्लीत फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविषयी तिला जिव्हाळा वाटू लागला. तेव्हा एका एनजीओच्या मदतीने तिने स्ट्रीट डॉगी जयाला कायदेशीररित्या दत्तक घेतले. Meral Bontenvel नेहमी वाराणसीला फिरण्यासाठी येत असते. तेव्हाच तिला जया भेटली. ज्यादिवशी मिरलला जया भेटली तेव्हा तिची अवस्था खूपच गंभीर होती. 


मिरलने डॉग केअर संस्थेसोबत संपर्क करुन जयावर उपचार केले. त्यानंतर तिला सोबत घेऊन जाण्याची इच्था व्यक्त केली. यावर संस्थेनेही सहमती दिली आणि सर्व कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली. स्ट्रीट डॉग असलेल्या जयाचा व्हिसा आणि पासपोर्टही बनवण्यात आला होता. 


वाराणसीची स्वयंसेवी संस्था अॅनिमोटल केअर ट्रस्टने मोकाट फिरणाऱ्या श्वानांची जबाबादारी घेतली आहे. या संस्थेच्या माध्यमातून नेदरलँडच्या मिरलने स्ट्रीट डॉगी जयाला आपल्यासोबत घेऊन घेऊन जाणार आहे. या श्वानाची रेबीज टेस्टही करण्यात आली आहे. वाराणसीबरोबरच नेदलँडमध्येही ही टेस्ट करण्यात आली. दोन्हीकडून परवानगी मिळाल्यानंतर जयाचा पासपोर्ट तयार करण्यात आला. 


जयाला वाराणसीतून दिल्लीला आणण्यत येईल त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी नेदलँडची राजधानी एम्सटर्डमसाठी विमानातून रवाना होईल. तोपर्यंत जयाला क्वॉरंटाईन ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन विदेशातील भूमीवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरणार नाही. डॉग केअर संस्था एनिमोटलचे डॉ. इंद्रनील बसूने सांगितलं की, कठीण कायदेशीर प्रक्रियेनंतर आज जया दिल्लीला जाण्यासाठी रवाना होणार आहे. जयाला पूर्ण ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जेणेवरुन नेदरलँडच्या वातावरणात ती रुळू शकेल. 


नेदरलँड येथे राहणाऱ्या मिरलचे वाराणसीत खूपवेळा येणेजाणे असते. त्यामुळं मिरल इंग्लीशसोबतच हिंदीदेखील बोलते.