`गुजरातमध्ये भाजप जिंकली, तर मशीनचे योगदान समजा`
कोणत्याच निवडणुकीत विरोधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी पराभूत होत असतात, असं राज ठाकरे यांनी भाजपविषयी बोलताना सांगितलं.
डोंबिवली : 'गुजरातमधील लोकांची मतं बदलत आहेत, गुजरातमध्ये तरीही भाजप जिंकली, तर मशीनचे योगदान समजा', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
अच्छे दिनचा फुगा लवकरच फुटणार आहे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
गुजरातच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने वेळेवर का केली नाही? निवडणूक आयोगा असं का करतंय, निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्योती आधी गुजरातमध्ये अधिकारी होते, ते आता नेमके निवडणूक आयोगात आहेत, असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं.
कोणत्याच निवडणुकीत विरोधी जिंकत नसतात, तर सत्ताधारी पराभूत होत असतात, असं राज ठाकरे यांनी भाजपविषयी बोलताना सांगितलं.
मनसेने मुंबईतील रेल्वे स्टेशन्स मोकळी केली आहेत. तरी देखील आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.