Rajasthan Polls : राजस्थानात विधानसभा निवडणुकीवरुन (Rajasthan Assembly Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात आता पंतप्रधान मोदी (PM Modi) देखील सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानमधील भरतपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसला घेरण्यासाठी पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शाहा यांच्यासह भाजपचे सर्व बडे नेते राजस्थानवर लक्ष ठेवून आहेत. राजस्थान विधानसभेची निवडणूक 25 नोव्हेंबरला आहे. यासाठी शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी भरतपूर कॉलेजमधून राज्यातील जनतेला संबोधित केले.विजय संकल्प जाहीर सभेतून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. गरीबांसाठी मी तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.


"काँग्रेसने राजस्थानच्या महिलांच्या आत्मविश्वासाला तडा दिला आहे. जिथे जिथे काँग्रेस येते तिथे दहशतवादी, गुन्हेगार आणि दंगलखोर बेपत्ता होतात. कोविडच्या काळात संपूर्ण देश घाबरला होता. प्रत्येक कुटुंब चिंतेत होते. अशा परिस्थितीत गरीब, दलित आणि मागासवर्गीयांची चूल विझू नये आणि एकही मूल उपाशी राहू नये, असा विचार गरीबाच्या मुलाने केला, म्हणून त्यांनी धान्याची दुकाने उघडली. गरिबांना मोफत रेशन द्यायला सुरुवात केली. मोफत रेशन योजना डिसेंबरमध्ये संपत आहे पण आम्ही ती पुढील पाच वर्षांसाठी वाढवली आहे. यामुळे काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगात माझ्याविरोधात एवढं मोठं पत्र दिलं आहे. ते कोर्टात जाण्याची धमकी देत आहेत. पण या मला गरिबांसाठी बलिदान द्यावे लागले तरी मी तयार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


"राजस्थानच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी इथं भाजपा आवश्यक आहे. राजस्थानमध्ये आता एक आठवड्यानंतर मतदान होणार आहे. सर्वत्र जन-जन की यही पुकार आ रही है भाजपा सरकार ही एकच गोष्ट ऐकू येत आहे. काही लोक इथे स्वतःला जादूगार म्हणवतात. आता राजस्थानचे लोक त्यांना 3 डिसेंबर काँग्रेस छू मंतर म्हणतील. राजस्थानमध्ये भाजपने एक अप्रतिम संकल्प पत्र जारी केले आहे. राजस्थानला देशातील आघाडीचे राज्य करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. आम्ही राजस्थानमधील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवू. आम्ही आमच्या बहिणी आणि मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू," असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.