Crime News : मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या सासरी जात तरूणाने सासरच्यांना दोघांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जात तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरूणाने पीडित तरूणीवर वर्षभर बलात्कार केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण?
एक वर्षापूर्वी  पीडित मुलगी चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. तिथं तिची आणि आरोपी मुसर्रफ या तरूणासोबत भेट झाली. मुसर्रफने पीडितेसोबत फोटो काढले आणि त्यानंतर तिला ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करू लागला. जवळपास वर्षभर आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत बलात्कार करत राहिला. बदनामीच्या भीतीने पीडितेने घरी काही सांगितलं नाही.


14 ऑगस्टला तरूणीचं लग्न झालं त्यानंतर नराधम पीडितेच्या सासरी पोहोचला. तिथे त्याने पीडितेसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सासरच्यांना दाखवले आणि पीडित गर्भवती असल्याचंही त्याने सांगितलं. सासरच्यांनीही तिच्यावर विश्वास न ठेवता माहेरी पाठवलं.
 
माहेरी आल्यावर पीडितेने सर्व प्रकार वडिलांना सांगितला, त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना राजस्थानच्या पहाडीमधील भरतपूर इथली आहे.