जयपूर : अभिनेता अक्षय कुमारच्या 'टॉयलेट - एक प्रेम कथा' या सिनेमात घरामध्ये शौचायलय का गरजेचं आहे हा संदेश दिला आहे. या सिनेमाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, आता अशीच एक घटना समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील भीलवाडा येथील एका महिलेच्या  सासरी टॉयलेट नसल्याने तिने थेट न्यायालयाची पायरी चढली आहे. या महिलेने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानेही या अर्जावर सुनावणी करताना घटस्फोट मंजूर केला.


भीलवाडातील उपनगरपूर येथे राहणा-या या महिलेचं लग्न आटूण येथे झाली होती. मात्र, सासरी पोहोचल्यावर तिच्या लक्षात आलं की घरात शौचालयचं नाहीये. तसेच झोपण्यासाठी वेगळी रूमही नव्हती. याप्रकरणी महिलेने आवाज उठविला असता तिला सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. 


या घटनेनंतर पीडित महिलेने आपला पती आणि सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २०१५ साली हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहोचले. त्यानंतर आता १७ जुलै रोजी न्यायालयाने घटस्फोटाच्या अर्जावर निर्णय देत घटस्फोट मंजूर केला. 


राजस्थानमधील मेवाड येथील भिलवाडामधील एका महिलेने ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना घरात शौचालय बनवण्यासाठी अनेकदा विनंती केली होती. मात्र, सासरच्या मंडळींनी तिची मागणी उडवून लावली. सातत्याने शौचालयाची मागणी केल्यानंतर सासरच्या मंडळींनी मारहाण केली असल्याचे महिलेने सांगितले. मारहाणीनंतर महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने महिलेच्या बाजूने निर्णय देत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातही शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून कोट्यावधी रुपयांचा गल्लाही जमवत आहे.