मुंबई : राजस्थान विधानसभेचा प्रचार शिगेला पोहचलाय. ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व पक्ष सज्ज झालेत. या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या एका महिलेनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय... ही उमेदवार आहे कामिनी जिंदल... केवळ ३० व्या वर्षी कामिनी २८७ करोड रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. या संपत्तीची माहिती कामिनीनं आपल्या नामांकन पत्रातही दिलीय. कामिनी ही सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलीय. नॅशनल युनियनिस्ट जमिनदार पक्षातून निवडणूक लढणारी कामिनी भाजप आणि काँग्रेससाठी मात्र डोकेदुखी ठरतेय.


कामिनी जिंदाल यशस्वी व्यावसायिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामिनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, कामिनी एक यशस्वी व्यावसायिक आहे. सध्या ती विकास डब्ल्यूएसपी लिमिटेडची संचालिका आहे. कामिनीचे वडील बी. डी. अग्रवाल या कंपनीचे अध्यक्ष आणि हरियाणाच्या हिसारचे मोठे व्यावसायिक आहेत. कामिनीच्या जन्मानंतर (१६ जून १९८८) केवळ सहा दिवसांत म्हणजेच २२ जून १९८८ रोजी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. 


शिक्षण आणि अनुभव


कामिनीनं बॅचलर ऑफ आर्टस आणि मास्टर ऑफ फिलॉसॉफीची डिग्री मिळवलीय. २०११ मध्ये जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जेएनयू) मधून तिनं समाजशास्त्रातून एमएची पदवी घेतलीय. त्यानंतर तिनं आपला कौटुंबिक व्यावसायात लक्ष घातलं... आणि आता तर तिनं राजकारणात आपला हात आजमावण्याचा निर्णय घेतलाय.


कामिनी जिंदाल  

आयपीएस अधिकाऱ्याशी विवाह


कामिनी जिंदाल हीनं गगनदीप सिंगला यांच्याशी विवाह केलाय. ते राजस्थान कॅडरचे आयपीएल अधिकारी आहेत. २०१३ साली कामिनीनं पहिल्यांदा निवडणूक लढली होती. श्रीगंगानगर जागेवरून इतिहासात सर्वाधिक ३७,०६८ मतांच्या फरकानं निवडणूक जिंकून येण्याचा रेकॉर्डही कामिनीच्याच नावावर जमा आहे. 


जिंदाल कुटुंबीयांची संपत्ती चर्चेचा विषय


याच वर्षी म्हणजे २०१३ साली कामिनीची आई विमला देवी यांनी संगरिया विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढली होती. यावेळी, नामांकन पत्रात विमला देवी यांनी आपली संपत्ती २७६२ करोड रुपये असल्याचं घोषित केलं होतं. यावेळी जिंदाल कुटुंबीयांच्या २९०० करोड रुपये संपत्तीच्या घोषणेवर बरीच चर्चाही झाली होती.