जयपूर : राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. 'आपण सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहोत, भाजपने पुन्हा एकदा जिंकून यावं, तसंच नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं' असं वक्तव्य कल्याण सिंग यांनी अलिगढमध्ये झालेल्या सभेत केलं होतं. एखाद्या राज्याच्या राज्यपालांनी निष्पक्षपाती असावं, मात्र, कल्याण सिंग यांनी भाषणात केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आलेत. निवडणूक आयोग राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे हे प्रकरण मांडणार आहे. 


 भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले. रविवारी रात्री गाझियाबाद इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. विरोधकांनी आदित्यनाथांवर सेनेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. आदित्यनाथांच्या वक्तव्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. तसेच आदित्यनाथांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. गाझियाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभा संदर्भातील व्हिडिओ क्लिप आणि त्याचं भाषांतर मागवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालेय अथवा नाही, याची चौकशी होणार आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना याअगोदरच, लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलाविषयी कोणताही मुद्दा उपस्थित न करण्याचा आणि दुष्प्रचार न करण्याची ताकीद दिली होती. तरीही योगी यांनी याला फाटा दिला आहे.