बायकोने पाणी दिलं अन् तोंडातून पांढरा फेस, नक्की काय घडलं?
जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तिनेच घात केला, थरकाप उडवणारी घटना
Crime News : प्रेम आंधळं असतं हे अनेकदा आपण ऐकलं असेल असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. प्रियकरासाठी पत्नीने तिच्याच पतीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीच्या या कृत्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. पतीने आधी रंगेहाथ पकडूनही तिला माफ केलं होतं मात्र अखेर तिने घात केलाच.
नेमकं काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या हनुमानगढ पिलीबंगामध्ये पत्नी मीनाचंं गावातील तरूणासोबत अफेर होतं. मीना आणि तिचा पती नसीरच्या लग्नाला 13 वर्षापुर्वी लग्न झालं होतं आणि दोघांना दोन मुले आहेत. मीनाचे गावातील तरूणासोबत अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. घरात भांडणं होत असल्याने मीना आणि नसीर वेगळे राहत होते. तरीही दोघांमध्ये रोज भांडणं व्हायचीत.
नसीर जेव्हा कामावर जायचा त्यावेळी दुपारी तो तरूण मीनाच्या घरी यायचा. नसीरला याबाबत माहित झाल्यावर त्याने पंचायतीत हे प्रकरण गेलं. त्यावेळी मीनाने तिची चूक मान्य केली तरूणासोबत संबंध न ठेवण्याचं वचन दिलं होतं. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा दोघे संपर्कात आले. मात्र नरसी आता दोघांच्या नात्यामध्ये अडसरा बनला होता. दोघांनीही त्याला संपवण्याचा कट आखला होता, मीना फक्त संधीची वाट पाहत होती.
4 ऑक्टोबर रोजी नसीर रात्री कामावरून रात्री 8-9 च्या सुमारास घरी परततो. घरी आल्यावर मीना त्याला पाणी प्यायला देते. मात्र ते पाणी पिताच नसीरची प्रकृती खालावते आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागतो. त्या अवस्थेत तो धावत धावत वडिलांच्या घरी जातो तिथेच बेशुद्ध होऊन पडतो, घरचे त्याला रुग्णालयात दाखल करतात. नरसीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिसात नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून एसआय हरबन्स या प्रकरणाचा तपास करत आहेत.