देशातील `या` रहस्यमयी मंदिरात संध्याकाळी थांबण्याची कोणीही चूक करत नाही कारण...! ऐकून बसेल धक्का
या गुपितांबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही.
बारमेर : जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी रहस्यमय मानली जातात. या गुपितांबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही. भारतातही असं एक मंदिर आहे जे रहस्यांनी भरलेलं आहे. ज्याबद्दल असं मानलं जातं की, जो संध्याकाळनंतर या मंदिरात राहतो तो कायमचा दगड बनतो. त्यामुळे या मंदिरात येण्याचं नाव घेताच लोकांची अवस्था बिकट होते.
आज आम्ही तुम्हाला या मंदिराबद्दल सांगणार आहोत. हे मंदिर राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात आहे. किराडू मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. या मंदिरात अनेक लोक येत असले तरी बहुतेक लोक संध्याकाळपूर्वी निघून जातात. या मागचं कारण खूप अनोखं आहे.
असं म्हटलं जातं की, सूर्यास्तानंतर जो कोणी या मंदिरात थांबतो तो कायमचा दगड बनतो. त्यामागे साधूचा शाप असल्याचं मानलं जातं. या मंदिराबद्दल लोक म्हणतात की, संध्याकाळनंतर जो कोणी या ठिकाणी थांबतं त्याचा दगड बनून जातो.
बाडमेरचं हे किराडू मंदिर अवशेषांच्या मधोमध वसलेलं आहे, जिथे अनेकांना जायचं नसतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते, अतिशय सुंदर आहे. त्यामुळे अनेकजण ते पाहण्यासाठी येतात, पण ते संध्याकाळपूर्वीच मंदिरातून परततात. त्याच वेळी, बहुतेक लोक हे मंदिर दुरून पाहूनच परततात, त्यांना या मंदिराच्या आत जाण्याची हिम्मत करत नाही.