जयपूर : भारतीय वायुसेनेला मोठा झटका बसला आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान आज कोसळले. दरम्यान, या दुर्घटनेत विमानाचा पायलट सुरक्षित आहे. मिग-21 विमान कोसळले त्यावेळी विमानातून पायलट सुरक्षित बाहेर पडला, त्यामुळे त्याला जीवदान मिळाले आहे. दरम्यान, घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे अधिकारी दाखल झाले असून विमानाला कशामुळे अपघात झाला, याची चौकशी करण्यात येत आहे.




दरम्यान, भारतीय हवाई दलाने मिराज विमानांचा पाकिस्तानमधील बालाकोट दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी वापर केला होता. त्यानंतर पाकिस्तानने घुसखोरी करत एफ -16 लढावू विमाने भारतीय हद्दीत घुसवली होती. त्यावेळी भारतीय विमानांनी पाकिस्तानची विमाने पिटाळून लावली होती. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एक एफ-16 विमान पाडले होते. त्यानंतर भारताचे मिराज विमान पाकिस्तान हद्दीद कोसळले होते. तसेच गेल्या काही दिवासांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे भारतीय हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट शहीद झाले होते. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघात झाला होता.