राजस्थातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. लपाछुपी खेळता खेळता दोन लहान बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबियांना हा सगळा प्रकार तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बराच पर्यत्न करुनही दोघांना वाचवता आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुले खेळत असताना पालकांनी त्यांच्या आजूबाजूला असणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय या घटनेनं आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात दोन चुलत बहिणी लपाछपी खेळत असताना फ्रीजरमध्ये अडकल्या. दोन्ही बहिणींना फ्रीजरमधून बाहेर पडता येत नसल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यातच दोघांचाही मृत्यू झाला. घरच्यांना ही माहिती कळताच त्यांनी दोघींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोघांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणाची नोंद केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या खमनोर भागातील बलिचा गावात ही दुःखद घटना घडली. बलिचा गावात दोन चुलत बहिणी कार्यक्रमासाठी आलेल्या घरात लपाछपी खेळत होत्या. खेळता खेळता दोघी बहिणींनी आईस्क्रीम फ्रीजरमध्ये लपायचं ठरवलं. दोघींही फ्रीजरचा दरवाजा उघडून आत जाऊन बसल्या. मात्र त्यांना पुन्हा दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे दोघांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


 बराच वेळ मुली घरात दिसल्या नाहीत म्हणून घरच्यांनी बरीच शोधाशोध केली. मात्र दोघेही कुठेही सापडल्या नाहीत. शेवटी कुटुंबियांनी आईस्क्रीम फ्रिजरमध्ये पाहण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी फ्रिजर उघडून पाहिला असता त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. दोन्ही बहिणी आतमध्ये निपचित पडल्या होता. दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला होता.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी भवानी शंकर यांनी सांगितले की, "दोन्ही मुली चुलत बहिणी आहेत. त्या घरात लपाछपी खेळत होत्या. दोघेही आपल्या कुटुंबीयांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. खेळादरम्यान त्या फ्रीजरमध्ये लपल्या. फ्रीझरचा दरवाजा बाहेरून बंद केला. मुलींचे कुटुंबीय त्यावेळी कार्यक्रमात व्यस्त होते. बराच मुली न दिसल्याने कुटुंबीयांनी दोघींचा शोध सुरू केला. त्यांनी पाहिले असता फ्रीजरमध्ये दोन्ही मुली मृतावस्थेत आढळल्या. 10 वर्षांची पायल आणि 11 वर्षांची रितिका यांचा फ्रिजरमध्ये मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे."