जयपूर : २०१९ ला अलविदा करुन सर्वांनी २०२० मध्ये पदार्पण केले. देशात तसेच जगभरात मोठ्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. कुठे नाचगाणी सुरु होती तर कुठे समुद्र किनारे फुलून गेले होते. तर असंख्य मद्यप्रेमींनी मद्याच्या धुंदीतच नववर्षात पदार्पण केले. यामध्ये राजस्थान देखील मागे नव्हता. ३१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत राजस्थानमधून १ अब्ज ४ कोटी रुपयांच्या दारूची हॉटेलमधून विक्री झाली. हे नवा रेकॉर्ड राजस्थानच्या मद्यप्रेमींनी प्रस्थापीत केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारूच्या वाढत्या विक्रीमुळे राजस्थान सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाला कराच्या माध्यमातून खूप मोठा फायदा झाला आहे. २०१८ ची सांगता होताना इथे ६३ कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली होती. बियर विक्रीचा आकडा देखील मोठाच होता. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या आकड्यानुसार ३० आणि ३१ डिसेंबरला एकूण १ अब्ज ७१ कोटींच्या दारूची विक्री झाली. ३० डिसेंबरला ६७ कोटी ६७ लाख आणि ३१ डिसेंबरला १०४ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. ही सर्वात मोठी विक्री असल्याचा दावा उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.



३१ कोटींची इंग्लिश दारु 


३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री १ अब्ज ७१ कोटी रुपयांच्या मद्यविक्रीत ४० कोटी रुपयांची बियर आणि १ अब्ज ३१ कोटी रुपयांची इंग्लिश मद्यविक्री झाली. नव्या वर्षातही पिणे आणि पाजण्याचे प्रमाण थांबले नव्हते.