कॉपीसाठी कानात ब्ल्यूटूथ बग, पण सर्जरी करून काढावा लागला...
राजस्थानमध्ये रविवारी राजस्थान अध्यापक पात्रता परीक्षेत असा कॉपी करणारा पकडण्यात आला ज्याने कानात ब्ल्यू टूथ बग लावला आहे. हा बग काढण्यासाठी या परीक्षार्थीची छोटी सर्जरी करावी लागली.
जयपूर : राजस्थानमध्ये रविवारी राजस्थान अध्यापक पात्रता परीक्षेत असा कॉपी करणारा पकडण्यात आला ज्याने कानात ब्ल्यू टूथ बग लावला आहे. हा बग काढण्यासाठी या परीक्षार्थीची छोटी सर्जरी करावी लागली.
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात रविवारी बहरोड पीजी कॉलेजमध्ये कॉपी करणारा आरोपी रघुनाथ विश्नोई पकडला गेला. त्याच्या कानात ब्ल्यूटूथ आणि अंडर गारमेंट्समध्ये एक डिव्हाइस लवपविण्यात आले होते. परीक्षा दरम्यान कानातून आवाज ऐकू आला. तर त्याला परीक्षा केंद्रातून उठविण्यात आले.
चौकशी करण्यात आली तेव्हा त्याच्या कानात ब्ल्यू टूथ बग लपविण्यात आला होता. हे उपकरण त्याने १५ हजार रुपयांना विकत घेतले होते आणि कॉपी करण्यासाठी पाच लाख रुपयांचा करार करण्यात आला होता. डॉक्टरांनी एक छोटी सर्जरी करून हे उपकरण बाहेर काढले. या शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून तृतीय श्रेणी शिक्षक पदासाठी थेट भरती होणार होती.