रणथंबोर : आतापर्यंत दोन वाघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर कसे भिडतात, ही दृश्यं आपण पाहिली असतील... पण हा व्हिडिओ आहे राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय अभयारण्यातला....  आणि ही झुंज आहे वाघ आणि वाघीण यांच्यातली.... हे तुंबळ युद्ध कॅमेऱ्यात कैद झालंय... साधारणपणे हद्दीच्या वादातून दोघे नर एकमेकांवर आक्रमण करतात... पण वाघ आणि वाघीण यांच्यात ही युद्धाची ठिणगी का पडली, हे समजू शकलं नाही... सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय...